चॉकलेट आयटम (How to made Chocolate) कसे बनवायचे ? माझ्याकडे पनीर कोको वडी, कोको बिस्कीट वडी, खवा कोको वडी, आणि मावा कोको करंजी बनवण्याची पद्धत आहे
या ब्लॉगमध्ये आम्ही काही प्रकारचे चॉकलेट आयटम तयार करीत आहोत. आपण हे घरी करू शकता आणि आपल्या Receipesबद्दल आम्हाला अभिप्राय द्या. आम्ही आपल्या स्वयंपाक करण्याच्या सोप्या पद्धतींसाठी पाककृती (Receipes) देत आहोत.
या ब्लॉगमध्ये आम्ही पनीर कोको वडी, कोको बिस्कीट वडी, खवा कोको वडी आणि मावा कोको करंजी कसे बनवायचे याबद्दल शिकवतो आहोत.
पनीर कोको वडी-
साहित्य:
२ वाटी पनीरचा चोथा, पाव वाटी डेसिकेटेड नारळ (नारळाचा चुरा) सव्वा वाटी पिठी साखर, काजूची पूड पाव वाटी, कोको पावडर पाव वाटी, विलायची पूड अर्धा चमचा, चॉकलेट पावडर २ चमचे. वरील सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्या, घट्ट वाटल्यास साय लावा. चांगले मळून वेगवेगळ्या साच्याच्या सहाय्याने वड्या पाडा. चवदार कोको पनीर वडी सर्वांनाच आवडेल.
कोको
बिस्कीट वडी-
साहित्य:
२ वाटी मारी किंवा पारले बिस्कीटाचा चुरा, पाव वाटी कोको पावडर, डेसिकेटेड नारळ पाव वाटी, २ चमचे मलाई, २ चमचे पिठी साखर. वरील सर्व साहित्य एकत्र करून साय घालून मळून घ्या. साच्याच्या साहाय्याने वड्या पाडा.
खवा कोको वडी-
साहित्य:
२ वाटी खवा, पाव वाटी कोको पावडर, २ चमचे चॉकलेट पावडर, विलायची पूड अर्धा चमचा, नारळाचा चुरा पाव वाटी, पिठी साखर दीड वाटी.
कृती:
खवा मंद आचेवर परतून घ्यावा व थंड होऊ द्यावा. त्यामध्ये नारळाचा चुरा, पिठी साखर, कोको पावडर व चॉकलेट पावडर घालून, विलायची पूड घाला, चांगले मळून साहाय्याने वड्या पाडा. वेगवेगळ्या साच्याच्या
मावा कोको करंजी-
साहित्य:
२ वाटी खवा, पाव वाटी कोको पावडर, दीड वाटी साखर, अर्धा चमचा विलायची पूड, डेसिकेटेड नारळ १ वाटी.
कृती: खवा मंद आचेवर परतून घ्या, खवा थंड झाल्यावर, साखर, कोको पावडर, नारळाचा किस व विलायची पूड घालून मिसळून ठेवा. करंजी आवरण २ वाटी रवा, २ चमचे मोहन, चिमटीभर मीठ. तळणासाठी तूप. खव्यामध्ये मोहन व मीठ घालून दूध मिश्रीत पाण्याचे भिजवून ठेवा. २ तास भिजू द्या. करताना चांगले मळून लाट्या करा व पुरी लाटून सारण भरा, करंजीचा आकार द्या व तुपावर तळून घ्या. चॉकलेटच्या चवीने मजा येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा