मक्याच्या कणसाची भजी (Bhajji of corn kernels) आणि निनावं (Ninave) , हरितालिकेच्या दिवशी हे अन्न (Food )बनवा
मक्याच्या कणसाची भजी
मक्याच्या कणसाची भजी |
नेहमीप्रमाणें भज्याचं पीठ भिजवून त्यात मक्याची २ कणसं किसून टाकावी. कणीस जुने असल्यास मिक्सरमधून बरीक करून घ्यावी. गरमागरम भजी सर्व्ह करावी.
हरितालिकेच्या आदल्या दिवशी म्हणजे श्रावण महिना संपल्यावर येणरा दिवस म्हणजे आवरणं. कुणी ह्या दिवसाला दाटाही म्हणतात. लहानमुली पण हरितालिकेचा उपवास करणार म्हणून त्यांच्यासाठी बरेच खाऊ करण्याची प्रथा पडली अहे तेव्हा दाटा म्हटलं की त्यादिवशी निनावं आणि चकली झालीच पाहिजे. असा साधा, सोपा, तेल-तूप विरहित पदार्थ.
निनावं
साहित्य-१ किलो हरभऱ्याची डाळ, १/४ किलो गहू, दोन्ही खमंग भाजून जाडसर पीठ दून आणावं.
१ वाटी पंठ, १ १/२ वाटी नारळाचं दूध, ३/४ वाटी बरिक केलेला गूळ (आवडी प्रमाणे कमी जास्त) १ चमचा जायफळ पूड, चिमूटभर मीठ, काजूचे तुकडे.
कृती - एका पसरट भांड्यात सर्व जिन्नस एकत्र करून गुठळी न होऊ देता गॅसवर ठेवून घोटत राहावे. घट्ट झाल्यावर छान वाफ आणावी. गार झाल्यावर पातेल उपड करून ताटात काढाव आणि वड्या पाडाव्यात. सर्व्ह करताना वरून काजूचे तुकडे टाकून सुशोभित करावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा